भाषांतरे [३३]
English
- Ācāriya Buddharakkhita (1985)
- Bhikkhu Ānandajoti (2017)
- Bhikkhu Sujato
- Peter Feldmeier (2013)
- Suddhāso Bhikkhu (2021)
繁體字
- 葉均
日本語
- 関西パーリ語実習会 (2023)
Français
- Fernand Hû (1878)
Deutsch
- Ekkehard Saß (1995)
- Sabbamitta
Italiano
- Chandra Candiani
Español
- Isidatta (2011)
Català
- Jambudipa
- Nil Durall (2016)
Português
- Michael Beisert (2000)
- Pedro Guimarães (2013)
Latine
- V. Fausböll
Nederlands
- Guy Eugène Dubois
- Peter van Loosbroek
Norsk
- Kåre A. Lie (1976)
Magyar
- Fórizs László (2009)
Čeština
- Štěpán Chromovský
Polski
- Zbigniew Becker
Eesti keel
- Ṭhitañāṇa Bhikkhu (Dr. Andrus Kahn) (2025)
Slovenščina
- Ajahn Hiriko
עִבְרִית
- Shai Schwartz (2014)
ქართული
- Luka Elizbarashvili (2026)
मराठी
- अशोक तपासे, हर्षदा तपासे
தமிழ்
- Ven. Nilwakke Somananda Thera
Việt Ngữ
- Thích Minh Châu
සිංහල
- A.P. de Zoysa
ပြန်သွားရန်
- Pitaka Myanmar Translation
पाळिभासा (Pāli)
- Mahāsaṅgīti Tipiṭaka
संदर्भ
- Sutta Central
धम्मपदं १—यमकवग्गो
स्वभावाच्या पुढे मन असते, मन (सर्व)श्रेष्ठ आहे,
विकृत मनाने बोलतो वा कृती करतो तेंव्हा
त्याच्या मागे दुक्ख असे येते, जसे (बैलाच्या) पावलांमागे चाक जाते.(१)स्वभावाच्या पुढे मन असते, मन (सर्व)श्रेष्ठ आहे,
प्रसन्न मनाने बोलतो वा कृती करतो तेंव्हा
त्याच्या मागे सुख असे येते, जशी सावली. (२)मला अपमानिले, माझा शेवट केला, मला जिंकले,
जे असे वैर धरतात, त्यांचे वैर शमत नाही. (३)मला अपमानिले, माझा शेवट केला, मला जिंकले,
जे असे वैर न धरतात, त्यांचेच वैर शमते. (४)वैराने वैर कधीही शमत नाही,
ते अवैरानेच शमते, असा पुर्वापार सिद्धांत आहे. (५)त्यांचे नव्हे, आपण मरणारच आहोत हे जे जाणित नाहित,
त्यांचेच वैर शमते, आपण मरणारच आहोत हे जे जाणतात. (६)(फक्त) चांगलेच पहात फिरणारा, इन्द्रीयांवर ताबा नसलेला,
भोजनाची (योग्य) मात्रा न जाणणारा, निरुद्योगी, हिंमत हारलेला,
त्याला, भुलैया असे जिंकतो, जसे वारा दुर्बल झाडाला (वाकवीतो). (७)(फक्त) चांगलेच न पहात फिरणारा, इन्द्रीयांवर योग्य ताबा असलेला,
भोजनाची (योग्य) मात्रा जाणणारा, प्रयत्नशील, हिंमतवान, त्याला,
भुलैया जिंकु शकत नाही, जसे वारा शैल पर्वताला हलवू शकत नाही.(८)मलयुक्त चित्ताने जो भगवी वस्त्र परिधान करतो तो,
सत्य व संयमाहून दूर गेलेला, भगवी वस्त्र धारण करण्यास लायक नाही. (९)जो दोषविरहीत आहे, शीलवान आहे, चांगला एकाग्रचित्त आहे,
सत्य व संयमा जवळ असणारा, तो भगवी वस्त्र धारण करण्यास लायक आहे.(१०)सत्वहीनात सत्व पहाणारा, सात्विकात सत्वहीनता पहाणारा,
खोटे संकल्प पहाणारा (करणारा) सात्विकता प्राप्त करीत नाही. (११)सात्विकतेतच सत्व पहाणारा, सत्वहीनतेत असत्व पहाणारा,
सम्यक संकल्प पहाणारा (करणारा) सात्विकता प्राप्त करतो. (१२)जसे छतविरहीत घरात पाऊस आरपार जातो,
तसे अननुभवीच्या (मानवाच्या) मनात रोगाचा प्रवेश होतो.(१३)जसे चांगल्या छताच्या घरात पाऊस प्रवेश करित नाही,
तसे अनुभवीच्या (मानवाच्या) मनात रोगाचा प्रवेश होत नाही.(१४)इथेही चिंतीत, मृत्योत्तरही चिंतीत,
दुष्कंर्मी दोन्हीकडे चिंतीत असतात,
ते केलेल्या कुकर्मांना पाहुन चिंतीत होतात, पीडीत होतात. (१५)इथेही आनंदीत, मृत्योत्तरही आनंदीत, सत्कर्मी दोन्हीकडे आनंदीत असतात,
ते केलेल्या सत्कर्मांना पाहुन आनंदीत होतात, अधिक आनंदीत होतात. (१६)इथेही तप्त, मृत्योत्तरही तप्त, दुष्कर्मी दोन्हीकडे तप्त असतात,
ते केलेल्या कुकर्मांना पाहुन तप्त होतात, दूर्गतीकडे जातात. (१७)इथेही प्रसन्न, मृत्योत्तरही प्रसन्न, सत्कर्मी दोन्हीकडे प्रसन्न असतात,
मी सत्कर्म केले (या विचारांनी) प्रसन्न होतात, अधिक प्रसन्न होतात. (१८)पुष्कळ (ग्रंथ) वाचून तस्कर वा प्रमादी मानव (भाग्यवान, श्रमण होत नाही),
दुसर्यांच्या गाई मोजून गो-पालक भाग्यवान, श्रमण होत नाही. (१९)थोडेसेच (ग्रंथ) वाचून सैद्धांतिक आचरणाने सदाचारी होतो,
राग, दोष, मोह त्यागून, सम्यक जाणिवेने, मुक्त चित्ताने,
अनासक्त, असा (मानव) भाग्यवान, श्रमण होतो. (२०)
भाषांतरे [३३]
English
- Ācāriya Buddharakkhita (1985)
- Bhikkhu Ānandajoti (2017)
- Bhikkhu Sujato
- Peter Feldmeier (2013)
- Suddhāso Bhikkhu (2021)
繁體字
- 葉均
日本語
- 関西パーリ語実習会 (2023)
Français
- Fernand Hû (1878)
Deutsch
- Ekkehard Saß (1995)
- Sabbamitta
Italiano
- Chandra Candiani
Español
- Isidatta (2011)
Català
- Jambudipa
- Nil Durall (2016)
Português
- Michael Beisert (2000)
- Pedro Guimarães (2013)
Latine
- V. Fausböll
Nederlands
- Guy Eugène Dubois
- Peter van Loosbroek
Norsk
- Kåre A. Lie (1976)
Magyar
- Fórizs László (2009)
Čeština
- Štěpán Chromovský
Polski
- Zbigniew Becker
Eesti keel
- Ṭhitañāṇa Bhikkhu (Dr. Andrus Kahn) (2025)
Slovenščina
- Ajahn Hiriko
עִבְרִית
- Shai Schwartz (2014)
ქართული
- Luka Elizbarashvili (2026)
मराठी
- अशोक तपासे, हर्षदा तपासे
தமிழ்
- Ven. Nilwakke Somananda Thera
Việt Ngữ
- Thích Minh Châu
සිංහල
- A.P. de Zoysa
ပြန်သွားရန်
- Pitaka Myanmar Translation
पाळिभासा (Pāli)
- Mahāsaṅgīti Tipiṭaka
संदर्भ
- Sutta Central
धम्मपदं १—यमकवग्गो
विवेचन [१]
English